दि.6 ता.मावळ, ( धनगड नाही,धांगड आहेत.धनगर ही जात आहे,जमात नाही.) आदिवासींन मध्ये होणारी घुसखोरी थांबवा यावर आदिवासी समाज झाला आक्रमक. 


     धनगर ,धनगड हे दोन्हीही शब्द अनुसूचित जमातीच्या सुचित नाहीत. धनगड ही जमातच नाही. तरीही काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधीकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सुचित घुसविण्यासाठी असंवैधानिक मागणीचा पाठपुरावा करतांना दिसत आहे. याबाबत बिरसा ब्रिगेड जाहीर निषेध नोंदवित आहे.

महाराष्ट्राच्या सुचित Dhangad या शब्दाचे भाषांतर धनगड असे केल्या जात आहे.त्याचे भाषांतर धांगड असे हवे आहे. महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक ३६ वर ओराँन जमात आहे. तीची पोटजमात धांगड आहे. ओराँन ही भारतातील प्रमुख जमात आहे. तीला ७ राज्याच्या सुचित दर्शविले आहे. महाराष्ट्रात ओराँन, धांगड नाहीत. पण सुचित आहे. संविधान आदेश १९५० मध्ये प्रमुख जमाती नंतर तीची पोटजमात दर्शविली आहे. १) बिहार २५ - ओराँन. २)मध्यप्रदेश ३५ - ओराँन, धानका,धांगड. ३) महाराष्ट्र ३६- ओराँन, धांगड.४)ओरीसा ५३ - ओराँन. ५) पश्चिम बंगाल ३५ - ओराँन.६) छत्तीसगड ३३- ओराँन, धानका, धांगड. ७)झारखंड - ओराँन, धांगड.

ओराँनच्या शेतात, घरी रोजंदार म्हणून काम करणारी धांगड ही जमात होय. या दोन्ही जमातीचे खानपान, रितीरिवाज, प्रथा, परंपरा, विधीसंस्कार सारखेच आहेत. ओराँन, धांगड जमातीचे लोक धर्मीज नावाच्या महादेवाची पुजा करतात. अन्नाकौरी किंवा महाधारी देवता यांच्यात आहे. त्यांचा मुख्य सण सरहुल आहे. ओराँन, धांगड लोक उरीया किंवा हिंदी भाषा बोलतात. धनगर जातीचा या जमातीशी तीळमात्र संबंध नाही.

महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत क्र.३६ वर ओराँन, धांगड आहे. पण ती जमात मध्येप्रदेशात स्थलांतरीत आहे. व सुचितील शब्द धनगड किंवा धनगर नाही. तर 

तो धांगड आहे.

म्हणुन धनगरांना आदिवासी मध्ये समाविस्ट करु नये म्हणुन मावळचे तहसिलदार यांना मावळ तालुक्यातील बिरसा ब्रिगेड मावळ, आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य व बिरसा ब्रिगेड सह्याद्री च्या वतिने निवेदन देण्यात आले. यावेळी खालील मान्यवर उपस्थीत होते. बिरसा ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी कशाळे, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष शंकर (भाऊ) बोऱ्हाडे, तसेच बिरसा ब्रिगेड मार्गदर्शक शंकर सुपे, राघुजी तळपे, मचिंद्र गोंटे, काशिनाथ दगडे, दत्ता कोकाटे, दिपक कोकाटे, शंकर हेमाडे, नारायण चिमटे, माऊली आढरी, व जिल्हा विभाग प्रमुख योगेश मदगे, सचिव गणेश मोरमारे, सरचिटनिस बाबुरावल वाजे, प्रसिध्दीप्रमुख मंगेश लांघी, विशाल झडे, मारुती चिमटे, महिला प्रतिनिधी रुपाली सुपे, जिल्हा प्रतिनिधी शारदा सुपे, भाऊ गवारी, संतोष मदगे, कोषाध्यक्ष दिलिप बगाड, कैलास करवंदे, कार्याध्यक्ष रवि घोडे, मुख्यसंघटक किरणनाना हेमाडे, संघटक सुरेश बगाड, श्रीरंग गोडे, सोरकादे, लक्ष्मण शेळकंदे, लक्ष्मण मरभळ, किरण हिले, मच्छिद्र दगडे, शिवप्रसाद गवारी, इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.