मावळचे तहसिलदार *मधूसुधन बर्गे साहेब* यांना ठोकळवाडी धरणाच्या हद्दीत जमिनी गेलेल्या आदिवासी बांधवांना *धरणग्रस्त* दाखले मिळावेत, शेतीला विनाशर्ती पाणी मिळावे, धरणासंदर्भातील अनेक प्रश्न निवेदन मार्फत मांडण्यात आले. तसेच ठोकळवाडी धरणात वहानगाव ते माळेगाव खुर्द येते जलवाहतुक व्हावी म्हणुन पुर्वी प्रमाणे नाव पुर्वरत करण्याबाबत..
रेशिंग कार्ड असुन सुद्धा धान्य मिळत नाही ते मिळण्याबाबत.. आदिवासी कातकरी व पारधी समाजाला घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन मिळण्याबाबत. निवेदन देण्यात आले.
पंचायत समिती गटविकास अधिकारी *सुधिर भागवत साहेब* यांना पंचायत समितीमधुन येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये होणारा भ्रष्टाचार व दलाली मार्फत होणारे लाभार्थांचे आर्थिक शोषण थांबावा, येणाऱ्या योजना निःपक्षपातीपणे वितरीत व्हाव्यात यासाठी निवेदन देण्यात आले.
आदिवासी विभागाकडुन येणारी खावटी योजना व तिचे स्वरुप या संदर्भात *शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित शाखा कार्यालय जुन्नर व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक प्रादेशिक कार्यालय जुन्नर* कुमारी मगटराव, आर. ओ. रॉय, तसेच मावळचे विद्यमान आमदार *सुनिलआण्णा शेळके* यांच्याशी सखोल चर्चा करण्यात आली. या योजनेचा लाभ मावळ तालुक्यातील प्रत्येक आदिवासी बांधवांपर्यंत कसा पोहचेल याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
यासाठी बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते व जेष्ठ मार्गदर्शक मा. सभापती शंकरराव सुपे, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष शंकर ( भाऊ ) बोऱ्हाडे, नारायण चिमटे, संतु दगडे, नागुजी ढोंगे, बाबुराव वाजे, शिवाजी कशाळे, योगेश मदगे, गणेश मोरमारे, नारायण काठे, दिपक कोकाटे, गबळू लांघी, किसन सुपे, शंकर हेमाडे, राघोजी तळपे, केंगले सखाराम, ज्ञानेश्वर आढारी रघुनाथ सुपे, बंडू काठे, श्रीरंग गोडे, लहु पोफळे, किरण हिले, कैलास करवंदे, रवि घोडे, किरण हेमाडे, मारुती चिमटे, दिलिप बगाड, लक्ष्मण केंगले, भरत घोईरत, लालू लांघी, संदीप दगडे, लक्ष्मण मरभळ,सुरेश बोऱ्हाडे,सोमा बोऱ्हाडे, सुभाष लांघी, ज्ञानेश्वर मोरमारे सर,
काळुराम मदगे,
काशिनाथ दगडे, सुखदेव गवारी, सुरेश मदगे, भाऊ कोकणे, भाऊ कोकाटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.











0 टिप्पण्या