जय आदिवासी 🙏🏻🙏🏻
आज दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी *बिरसा ब्रिगेड, मावळची* मिटींग मावळ तालुक्याचे आमदार *सुनिलआण्णा शेळके* यांच्या सोबत बेलज या गावी झाली त्यात खालील विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
सर्वप्रथम संघटनेचे *अध्यक्ष आदि. शंकरभाऊ बोऱ्हाडे*, तसेच आदि. शंकर हेमाडे आदि. ज्ञानेश्वर कोकाटे, आदि. राघोजी तळपे, आदि. सतुजी दगडे यांच्या हस्ते आमदार साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
नंतर बिरसा ब्रिगेडच्या वतीने आदिवासी बांधवाच्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार साहेबांना देण्यात आले.
मावळ तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत *बिरसा बिग्रेड मावळच्या* वतिने बेलज येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
आदिवासी समाजाच्या विविध समस्या व मागण्यांवर आदिवासी बांधव व प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा झाली.
▪️ *आदिवासी मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी व त्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी या उद्देशाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती ठिकाणी शासकीय वस्तीगृह बांधणे.*
▪️ *सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमासाठी मावळ तालुक्यात आदिवासी सांस्कृतिक भवन बांधणे.*
▪️ *आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.*
▪️ *वडेश्वर येथील आश्रमशाळेचे नूतनीकरण करणे, अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.*
👉🏻 *पेसा प्रस्ताव राज्यपालांकडे पोहच झाला आहे. त्यात मावळची पण काही गावे आहेत त्यात मावळ तालुक्याची जी 50 टक्के आदिवासी लोक संख्येची गावे आहेत ती सर्व पेसा कायदा मध्ये यावित व मावळमध्ये लवकरात लवकर पेसा कायदा लागु व्हावा यासाठी आमदार साहेबांकडुन प्रयत्न व्हावेत.*
👉🏻 *कारकरी व पारधी समाजाला घर बांधण्यासाठी बेलज गावा प्रमाणे जागा उपलब्ध करुन मिळण्याबाबत*
👉🏻 *बेकायदा हस्तांतरित केलेल्या आदिवासींच्या जमिनी परत मिळवून देणेबाबत*
'आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. आदिवासी बांधवांचे शिक्षण, रोजगार, आरोग्य या सुविधांबाबत शासन संवेदनशील असून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आदिवासींचा विकास करावयाचा असेल तर मूलभूत सोयीसुविधा सुधारल्या पाहिजेत. विविध प्रश्नांची
सोडवणूक करण्यासाठी आदिवासी विभाग यांच्याकडे पाठपुरावा करु, गरज पडल्यास मा.आदिवासी विकास मंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल, असे यावेळी सांगितले.
*अशा सर्व मागण्यां पुर्ण करण्याचा शब्द आमदार साहेबांनी बिरसा ब्रिगेडच्या कार्यकर्यांना दिला.*
आदि. बाबुराव वाजे यांनी सुत्रसंचालन केले तर बाजीराव सुपे सरांनी आदिवासी समाजाच्या मागण्या प्रातिनिधीक स्वरुपात आमदार साहेबांसमोर मांडल्या.
या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आमदार साहेबांनी पुढच्या सहा महिन्यात हे सर्व प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन दिले.
बिरसा ब्रिगेड बेलज शाखा अध्यक्ष आदि. ज्ञानेश्वर कोकाटे यांनी आभार व्यक्त केले. तसेच.समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक आदि. शंकर हेमाडे जिल्हा संघटक आदि. शिवाजी कशाळे, आदि. योगेश मदगे, बिरसा ब्रिगेडचे आध्यक्ष आदि. शंकर (भाऊ ) बोऱ्हाडे, बिरसा ब्रिगेडचे उपाध्यक्ष आदि. जयदास सुपे, बिरसा ब्रिगेडचे सचिव आदि. गणेश मोरमारे. बिरसा ब्रिगेडची महिला प्रतिनिधी आदि. रुपालीताई सुपे, सरचिटणीस आदि. बाबुराव वाजे मुख्य संघटक आदि. किरण हेमाडे, कार्याध्यक्ष आदि. रवी घोडे, कोषाध्यक्ष आदि. दिलिप बगाड, प्रसिध्दी प्रमुख आदि. मंगेश लांघी, विशाल झडे, सहसचिव आदि. मारुती चिमटे, खजिनदार आदि. दत्ता दाते, बिरसा ब्रिगेडचे सदस्य आदि. सुरेश बगाड, आदि. हरिभाऊ सुपे साहेब, आदि. कैलास करवंदे, आदि. राजु हिलम, आदि. रमेश कशाळे, आदि. संतोष मोरमारे, आदि. विक्रम सोरकादे, आदि. लक्ष्मण केंगले, आदि. काशिनाथ दगडे, आदि. सुखदेव गवारी, आदि. ज्ञानेश्वर कोकाटे, आदि. भाऊ कोकाटे, आदि. सुरेश मदगे, आदि. बबन गवारी, आदि. चिमाजी कोकाटे,आदि. दत्ता कोकाटे, आदि. खंडू लांघी, आदि. युवराज कोकाटे, आदि. गणपत मदगे आदि. अजय बुरुड, व महिला प्रतिनिधी संगीता वाजे, सुवर्णा कोकाटे, अलका दगडे, संगीता कोकाटे, गजरा कोकाटे, सपना वाजे, वंदना गवारी इत्यादी कार्यकर्ते उपस्थीत होते.
तर बेलजचे बिरसा ब्रिगेडच्या शाखेचे सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी बहुमोलाची मदत केली.
जय आदिवासी.
जय बिरसा मुंडा.
जय राघोजी भांगरे.
जय नाग्या कातकरी.







0 टिप्पण्या